Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Kolhapur Jotiba Temple | २८६ वर्षांपूर्वीची दाननोंद उजेडात! जोतिबा मंदिरातील शिलालेखाचा उलगडा; काय आहे या ऐतिहासिक नोंदीत?
महाराष्ट्र

Kolhapur Jotiba Temple | २८६ वर्षांपूर्वीची दाननोंद उजेडात! जोतिबा मंदिरातील शिलालेखाचा उलगडा; काय आहे या ऐतिहासिक नोंदीत?

Kolhapur Jotiba Temple
35
Kolhapur Jotiba Temple: जोतिबा डोंगरावरील श्री जोतिबा मंदिरातील तब्बल २८६ वर्षे जुन्या शिलालेखाचा उलगडा झाला आहे. नेमका यात दानाची नोंद किती समोर आली आहे चला तर जाणून घेऊयात.

वाडी रत्नागिरी अर्थात (Wadi Ratnagiri History) जोतिबा डोंगरावरील दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातील ((Jotiba Temple Kolhapur) तब्बल २८६ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शिलालेखाचा उलगडा झाला आहे. मंदिरातील ओवरीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या दानाची किंवा बांधकामासंदर्भातील माहिती या शिलालेखातून समोर आली आहे. मात्र, शिलालेखाची पहिली ओळ प्लास्टरखाली गाडली गेल्याने त्याचे तातडीने जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. (Jotiba Temple News)

हेही वाचा: Drishyam The Conclusion: अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला CBFCची हिरवी झेंडी; कधी आणि कुठे होणार लॉन्च?

इ.स. १७४० या कालखंडातील शिलालेख (Jotiba Temple History)

पन्हाळा तालुक्यातील जोतिबा मंदिराच्या प्रांगणातील हत्तीची ओवरीच्या ईशान्य दिशेला, गुरवांच्या भिंतीखालील फरशीमध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान तो बांधकामात आढळून आला. शालिवाहन शक १६६२, रौद्री नाम संवत्सर अर्थात इ.स. १७४० या कालखंडातील हा शिलालेख सात ओळींचा असून, देवनागरी लिपीत मराठी भाषेत कोरलेला आहे. (Religious History Maharashtra)

सात ओळींचा शिलालेख

यात सात ओळंकींचा शिलालेख उघड्यावर असल्याने ऊन, पाऊस आणि वातावरणातील बदलांचा त्यावर परिणाम झाला आहे. शिलालेखाचे वाचन तज्ज्ञ अनिल किसन दुधाणे यांनी केले असून, कपिल ठाकरे, मेघराज बुने आणि डॉ. शैलेंद्र भांडारे यांचे सहकार्य लाभले. ( LS Marathi Latest News )

जोतिबा मंदिरातील ओवरीसाठी काही दान

शिलालेखात मौजे रेणवी येथील मोकादम पाटील नरसोजी, पदमोजी यांचे पुत्र, चौगुळा तसेच कर्यात षाणापूर (खानापूर), मामले मुर्तुजाबाद (मिरज) यांचा उल्लेख आहे. त्यांनी जोतिबा मंदिरातील ओवरीसाठी काही दान किंवा बांधकाम केले असावे, असा त्याचा अर्थ निघतो.

१८व्या शतकातील स्थानिक प्रशासन

हा शिलालेख १८व्या शतकातील स्थानिक प्रशासन, ग्रामीण सामाजिक जीवन आणि धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक साधन ठरणार आहे. तत्कालीन ग्रामीण प्रशासनाची रचना, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सामाजिक स्थान आणि त्या काळातील प्रशासकीय विभागणीवरही या शिलालेखातून प्रकाश पडतो.

१८व्या शतकातील स्थानिक प्रशासन, सामाजिक जीवन आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी हा शिलालेख महत्त्वपूर्ण ऐतिहासिक साधन आहे. त्यामुळे त्याचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.
— अनिल दुधाणे, शिलालेखतज्ज्ञ

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts