Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • लग्नानंतर समंथाची दुसऱ्या पतीने देखील केली फसवणूक; जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा सोशल मीडियावर चर्चाना उधाण
मनोरंजन

लग्नानंतर समंथाची दुसऱ्या पतीने देखील केली फसवणूक; जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा सोशल मीडियावर चर्चाना उधाण

Samantha second husband cheating news : अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू ने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधली. तिने दिग्दर्शक राज निडिमोरु यांच्याशी लग्न केलं. तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलेल्या पतीने देखील तिची मोठी फसवणूक केल्याच्या चर्चाना सोशल मीडियावर उधाण आले आहे. समंथा आणि राज यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती.

लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु यांनी 1डिसेंबर 2025 रोजी दुसरं लग्न केलं होतं. त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. अशातच ता राज निडिमोरु यांनी समंथाला फसवल्याच्या चर्चा सुरु आहे. कारण राज यांची पहिली पत्नी श्यामली डे हिच्या मैत्रिणीने राज आणि श्यामलीच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

श्यामलीच्या मैत्रिणीने केला खुलासा

2025 साली राज निडिमोरु आणि शामली डे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर त्यांचा डिव्होर्स झाल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु 2023 मध्ये शामली हिने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी खास पोस्ट केली होती. परंतु समंथा आणि राज यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर श्यामली च्या मैत्रिणीने धक्कादायक दावा केला. राज आणि श्यामली यांचा अजूनही घटस्फोट झालेला नसल्याचे तिने सांगितले.

काय होते वक्तव्य

अभिनेत्री श्यामली डे ची मैत्रीण भावना तपाडीया यांनी श्यामलीने शेअर केलेली पोस्ट पुन्हा एकदा शेअर करून खुलासा केला आहे. ‘जी लोकं मला विचारत होते… गेल्या वेळी मी जेव्हा चेक केलं, तेव्हा श्यामली आणि राज विवाहित होते, याचा अर्थ त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही…’ असे वक्तव्य तिने केले.

हे ही वाचा : कांतारा चॅप्टर 1 चित्रपटातील त्या सिनची नक्कल करणे रणवीर सिंहला पडले महागात; सोशल मीडियावर पोस्ट करत मागितली माफी

सोशल मीडियावर फसवणुकीच्या चर्चाना उधाण

श्यामलीच्या मैत्रिणीने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे आता समंथाचे चाहते आता संतापल्याचे दिसून येत आहे. या पोस्ट मुले राज निडिमोरूने समंथाची फसवणूक केल्याच्या चर्चाना आता उधाण आले आहे. तर अनेक जण म्हणताय कि समंथा हिला सर्वकाही माहिती असताना तिने राज याच्यासोबत लग्न केल. या वक्तव्यावर अद्याप देखील समंथा, राज आणि श्यामली यांनी मौन सोडलेले नाही.

कोण आहेत भावना आणि श्यामली?

श्यामली हि राज निडिमोरु यांची पहिली पत्नी असून तिने ‘रंग दे बसंती’ आणि अभिनेता अजय देवगण याच्या ‘ओमकारा’ सिनेमा सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं. कोण बनेगा करोडपती या अमिताभ बच्चन यांच्या शो मध्ये लेखिका म्हणून भावना काम करत असल्याची माहिती सूत्रानुसार मिळाली आहे.

पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

अभिनेत्री समन्था प्रभू आणि राज निडिमोरु यांचा विवाह सोहळा साध्या,पारंपारिक, आणि खाजगी पद्धतीने पार पडला. या लग्नसमारंभात समंथा लाल आणि सोनेरी पारंपरिक साडीत दिसली. हि साडी तिच्यावर प्रचंड खुलून दिसत होती. तर राज निडिमोरु याने ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्ता पायजमा आणि बेज रंगाचे जॅकेट परिधान केल्याचे दिसले. त्यांनी शेरा केलेल्या फोटोस मध्ये समंथा हातात अंगठी घालताना दिसत असून दुसऱ्या फोटोत लिंग भैरवी देवीचा आशीर्वाद घेताना तर एका फोटोत समंथा राजला मिठी मारताना दिसत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts