Shivajiraje Bhosale box office collection : नुकताच पुन्हा शिवाजीराजे भोसले हा महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची चांगली चर्चा सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की हा चित्रपट 2009 आली आलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा सिक्वेल असेल, परंतु असं नसून या चित्रपटात नवीन विषयाला हात घालण्यात आला आहे.
संपूर्ण देशात हा चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट तब्बल 11 वर्षानंतर प्रदर्शित झाला असून हा दिग्दर्शक मांजरेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण आज जाणून घेणार आहोत.
पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील बिग बजेट चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय. हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी महेश मांजरेकर यांनी सुरुवातीला साडेसात ते ८ कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते. परंतु त्यानंतर हे बजेट वाढले.आणि शेवटी हा चित्रपट 13 कोटींच्या बजेटवर गेला. या चित्रपटात वापरण्यात आलेल्या घोड्यांबद्दल महेश मांजरेकर यांनी सांगितलं की, चित्रपटात दाखवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा आणि आणखीन एक घोडा या दोन्ही घोड्यांचे भाडं तब्बल 19 लाख रुपये एवढे आहे.
हे हि वाचा : Thama vs Ek Deewane Ki Deewaniyat : थामा वर्सेस एक दिवाने की दिवानियत जाणून घ्या कोण कोणावर भारी ?
पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले असून या समस्या मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्तिरेखा वापरण्यात आली आहे. या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारली आहे ती म्हणजे सिद्धार्थ बोडके यांनी. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे महेश मांजरेकर यांनी.
View this post on Instagram
पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटांच्या नावावरून यापूर्वी वाद झाला होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाने प्रदर्शनाला हिरवा कंदील दर्शविला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई होत आहे. कलाकार सिद्धांत बोडके यांनी शिवाजी राजे यांच्या भूमिकेसाठी 17 किलो वजन कमी केल्याबद्दलची माहिती मिळाली आहे.
बॉक्स ऑफिसवर केली एवढी कमाई (Shivajiraje Bhosale box office collection)
Sacnilk या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 20 लाखांच्या जवळपास कमाई केली असून विकेंड मुळे या चित्रपटाच्या कमाई मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा हा सिक्वेल नसून एक नवीन कथा आहे. असं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे.












