Smruti Palash Wedding Break Reason : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि संगीतकार पालाश मुच्छल यांचे नोव्हेंबर 2025 या महिन्यात लग्न ठरले होते. परंतु अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याचे कारण देत लग्न पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती स्मृतीने सोशल मीडियावर शेअर केली होती. परंतु त्यानंतर पलाश मुच्छलने स्मृतीला फसवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आणि अखेर स्मृती मंधानाने तिचं लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा करत माहिती दिली होती. परंतु आता लग्नाबाबत मोठा खुलासा स्मृतीच्या मित्राने केला आहे.
स्मृती मंधाना ने लग्न मोडल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छलला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. अशातच काही दिवसांपूर्वी सांगलीत राहणाऱ्या स्मृतीच्या मित्राने संगीतकार पलाश मुच्छलवर सांगली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. त्याने आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप पलाश वर लगावला. तर आता विज्ञान माने याने स्मृती पालाशची लग्नाबद्दल आतली बातमी सांगितली आहे.
हे ही वाचा : हुंड्यासाठी पत्नीच्या घरात जाऊन करत होता जादूटोणा; याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
…. ते दृश्य अत्यंत भयानक होते
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले कि, 23 नोव्हेंबर रोजी म्हणजे लग्नाच्या तयारीवेळी मी तिथे उपस्थित होतो. त्यावेळी पलाशला दुस-या महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले. ते दृश्य अत्यंत भयानक होते. त्यावेळी स्मृतीच्या सहकारी मैत्रिणीं आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चांगला चोप दिला. पलाशचे संपूर्ण कुटुंब चिंधीचोर आहे. मला वाटलं होतं की तो लग्न करून सांगलीत सेटल होईल, पण सगळं उलटं झालं” असं विज्ञान माने म्हणाला.
10 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले
मागील महिन्यात जेव्हा मी पलाशच्या आईला भेटलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की, चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीचे बजेट आता 1.5 कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे त्यांनी मला आणखी 10 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. नाहीतर मला एकही रुपया परत मिळणार नाही असं सांगितलं. आणि मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर चित्रपटातून काढून टाकण्याची धमकीही दिली. म्हणूनच मला तक्रार दाखल करावी लागली” असंही यावेळी तो म्हणाला.
लग्न मोडल्यानंतर त मला सर्वच ठिकाणावरून ब्लॉक केले
मी पलाशसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला पलाशकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. स्मृती आणि पलाश चे लग्न मोडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयाने मला सर्वच ठिकाणावरून ब्लॉक केले. त्यावेळी मला समजलं कि, चित्रपटातील आणखी काही कलाकारांचे पैसे मिळालेले नाही. चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक निर्मात्यांनी फसवल्याच्या कहाण्या मी ऐकल्या आहे. परंतु ही पूर्णपणे चोरी आहे. असं देखील विज्ञान माने याने सांगितलं.












