यंदाचे 2025 हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्वपूर्ण ठरले आहे. 2025 मध्ये बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळले. पौराणिक चित्रपटांपासून रोमँटिक चित्रपटांपर्यंत सर्वच शैलीतील चित्रपटांनी वर्चस्व गाजवले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर यंदाच्या वर्षी जबरदस्त कामे झाल्याचे बघायला मिळाले. काही वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर मंदीचे वातावरण होते. मोठे दिग्गज स्टारकास्ट असून देखील बरेच चित्रपट फ्लॉप ठरत होते. परंतु यंदाचे वर्ष हे चित्रपट सृष्टीसाठी माईलस्टोन ठरले. कारण यंदा बॉक्स ऑफिसवर आकडेच बदलले नाही तर हिंदी चित्रपटांनी लोकांचा देखील विश्वास कमावला. 2025 मध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत छावा आणि सैयारा या चित्रपटांचे नावे आहेत. चला तर मग जाणून घेऊया २०२५ हे वर्ष गाजवलेल्या टॉप 5 चित्रपटांची यादी :
कांतारा चॅप्टर 1
2025 यावर्षी कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ऋषभ शेट्टी यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम या भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा 2022 मध्ये आलेल्या कांतारा चित्रपटाचाच सिक्वेल असून हा चित्रपट बुटा कोला या विधीच्या प्राचीन मुळांचा शोध घेतो. हा चित्रपट 2025 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने अंदाजे 697 कोटींची कमाई केली आहे.
छावा
मराठी कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट छावा हा 2025 मध्ये हिट ठरला. हा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनप्रवासावर आधारित असून या चित्रपटात विकी कौशल हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले. तर रश्मीका मंदाना राणीसाहेब येसूबाईच्या भूमिकेत दिसली. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून या चित्रपटातील अभिनयाने आणि ऍक्शन सीन्स ने प्रेक्षकांना प्रभावित केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 695 कोटी रुपयांची कमाई केली.
सैयारा
सैयारा चित्रपट हा 2025 मध्ये बनवण्यात आलेला संगीतमय रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट मोहित सुरु यांनी दिग्दर्शित केला असून 2004 मध्ये आलेल्या कोरियाइ फिल्म अ मुमेंन्ट टू रिमेंबर या चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात अहाना पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लोकप्रिय ठरेल असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 393 कोटींची कमाई केली आहे.
हे ही वाचा : स्मृति मांधानाचा मी आदर करते; पलाशचा चेहरा समोर आणायचा होता.. मेरी डीकॉस्टाचे वक्तव्य
कुली
कुली हा चित्रपट 2025 मधला तामिळ ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट लोकेश नागराज यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रजनीकांत, नागार्जुन अक्किनेनी, उपेंद्र, श्रुती हसन, सत्यराज, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, पूजा हेगडे या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 151 कोटीपेक्षा जास्त कमाई केली होती. तर आता पर्यंत भारतात 323 कोटींची कमाई केली आहे.
महावतार नरसिंह
अश्विन कुमार दिग्दर्शित महावतार नरसिंह हा पौराणिक ऍनिमेटेड चित्रपट आहे. 25 जुलै 2025 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भागवत पुराणातील भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारावर आधारित चित्रपट आहे.
यामध्ये असुर राजा हिरण्यकशिपू चा वाढ केला जातो. या ऍनिमेटेड चित्रपटाने मोठ्या मोठ्या चित्रपटाला मागे टाकत वर्चस्व कमावले. कमी बजेट मध्ये बनवण्यात आलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर 268 कोटींची कमाई केली.








