Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • 2026 या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार या खास वेबसिरीज
मनोरंजन

2026 या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार या खास वेबसिरीज

Upcoming web series releasing in 2026 on OTT platforms

Upcoming web series 2026 : आपण 2026 या वर्षाला सुरुवात झाली. या नवीन वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार असू अनेक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत घोषणा करण्यात आली. हे वर्ष फक्त चित्रपटसृष्टीसाठीच नाही तर वेब सिरीजसाठी देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजचे देखील काही सिक्वेल 2026 या वर्षात येणार आहे. तर काही नवीन वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये काही जास्त बजेट असलेल्या वेबसिरींजचा देखील समावेश असणार आहे. जाणून घेऊया या वेसिरीजची लिस्ट

हिरामंडी 2

संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी या वेबसीरिजने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला होता. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर टॉप वर असून 2026 मध्ये या वेबसिरीजचा सिक्वेल म्हणजेच दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या सिक्वेलच्या प्रदर्शनाबाबत घोषणा करण्यात आली असून रिलीज डेटबाबत अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. लवकरच ही वेबसिरीज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्या या वेबसिरीजवर काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या वेबसीरिजच्या सिक्वेलची घोषणा नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर केली आहे.

गुल्लक 5

2019 या वर्षात गुल्लक ही वेबसिरीज सोनी लिववर प्रदर्शित करण्यात आली होती. या वेब सीरिजने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान पटकावले होते. आता 2026 मध्ये सोनी लिववर गुल्लक या वेबसिरीजचा पाचवा सिझन येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला या वेबसीरीज मध्ये नवीन चेहेरे दिसू शकतात.

हे ही वाचा : धुरंधर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट; तरण आदर्श यांची पोस्ट

पंचायत 5

2026 मध्ये पंचायत या वेब सिरीजचा 5 वा सिझन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 2020 मध्ये पंचायत या वेबसिरीजचा पहिला सिझन प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता 2026 मध्ये amazone prime video वर ही वेबसिरीज रिलीज करण्यात येणार आहे. या सिझन मध्ये निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून Prime video ने या वेबसिरीजची घोषणा केली आहे. या वेबसीरिजचे काम सध्या सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

तस्करी स्मग्लर्स वेब

2026 या वर्षात इम्रान हाश्मी यांची वेबसिरीज तस्करी द स्मग्लर्स वेब प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये इम्रान हाश्मी कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमधील त्याचा लूक देखील समोर आला असून 14 जानेवारीला नेटफ्लिक्सवर ही वेबसिरीज येणार सलूनची चर्चा आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts