मुंबईच्या सहार एअर कार्गोमध्ये कार्यरत सीमा शुल्क अधीक्षकाला ₹10.20 लाखांची लाच घेताना CBI ने रंगेहाथ अटक केली. क्लिअरन्ससाठी दर किलोमागे ₹10 लाच मागितल्याचा आरोप असून, ही रक्कम स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मागितल्याचं समोर आलं आहे. धमकी देऊन माल रोखून धरल्याचाही खुलासा झाला आहे. आरोपी 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.












