मुंबईत कबुतरखाने अचानक बंद केल्यामुळे उडालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे – “कबुतरांना अन्न न मिळाल्याने मृत्यू होणं दुर्दैवी, त्यांचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, आरोग्यविषयक समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करून उपाययोजना कराव्यात आणि बीएमसीने कंट्रोल फीडिंगची जबाबदारी घ्यावी. तसेच, कबुतरखाने हळूहळू आणि नियोजनपूर्वक हलवावेत, असं मत मांडत त्यांनी जैन समाज आणि पक्षीप्रेमींना दिलासा दिला आहे. या भूमिकेमुळे मनसेच्या विरोधात वातावरण तापण्याची शक्यता आहे.












