मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करायचे आदेश दिल्यांनतर जैन समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यांनतर जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनतर मुख्यमंत्री यांनी विशेष बैठक घेऊन यावर तोडगा काढू असेही त्यांनी आश्वासन दिले. आज सकाळी जैन समाज दादर कबुतरखानाच्या तिथे आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडून टाकली. आंदोलक आत शिरून त्यांनी तिथले बांधकाम काढायचा प्रयत्न केला, सोबतच त्यांनी कबुतरखान्यात धान्य ही सगळीकडे पसरले. जेव्हा पोलिसांनी थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांनतर पोलिसांना गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ही आंदोलन स्थगित झालेच नव्हते राजकीय हेतूने ही अफवा पसरवली गेल्याची माहिती जैन आंदोलकांनी दिली.












