नवी मुंबई : लवकरच नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा नवा अध्याय सुरू होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा आणि नवा अध्याय सुरू होईल. कारण इथून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुंबईतल्या विमानतळावरचा ताण यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.
हे नवीन विमानतळ सर्वात मोठे, आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ असणार आहे. हे मुंबई आणि देशाच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वपूर्ण असेल. या विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या काही दिवसापासुन आंदोलने सुरु असून याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळात हा विषय मांडण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आधुनिक आणि स्मार्ट सुविधापूर्ण असेल. यामध्ये प्रवाशांच्या बॅगेज 360 डिग्री बारकोड स्कॅनिग प्रणाली वापरली जाणार असून यामुळे बॅगेज हाताळणे जलद आणि सोप्पे होईल. 37 मेगाहर्ट्झ ग्रीन झोनने सुसज्ज असे हे विमानतळ असणार आहे. कारण या ठिकाणी ग्रीन लेव्हल एअरपोर्टची संकल्पना राबवण्यात येणार आहे.
या नवीन विमानतळाचे नाव दि.बा. पाटील द्यावे या मागणीसाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. यामध्ये खासकरून आग्री कोळी समाजाचा समावेश आहे. याबाबत सरकारला त्यांनी निवेदन देखील दिले होते. जर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर विमानतळ चालू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला होता. आता लवकरच हे विमानतळ कार्यान्वित होणार असून नामकरणाबाबत चर्चा सुरु सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या संदार्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दि. बा. पाटील यांचे या नवी मुंबई या भागात योगदान मोठे आहे. त्यांनी प्रकल्पाग्रस्तांसाठी लढा दिला होता. त्यांचे योगदान हे प्रत्येक क्षेत्रात राहीले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे होत असलेले नवीन विमानतळ दि.बा. पाटील यांच्याच नावाने ओळखल्या गेले पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.









