IMD rain alert : महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. या बदलानुसार कधी जास्त थंडी तर मध्येच उष्णता जाणवते. सहसा सकाळी प्रचंड गारठा असतो तर दुपारी प्रचंड उष्णता. आता परत वातावरणात बदल होणार असून थंडीत देखील पाऊसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुषंगाने आज काही तासात देशातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये पुढील काही तासांनी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर राज्यात देखील मोठा अलर्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. राज्यात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला असून थंडीचा कडाका अजून वाढणार आहे.
मराठवाड्याचा पारा घसरला
थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे संपूर्ण राज्यात गारठा वाढला आहे. त्यानुसार निफाड तालुका प्रचंड गारठला असून तेथील तापमान 8 अंशावर पोहोचले आहे. याठिकाणी नागरिक रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटवत असल्याचे देखील दिसत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान घसरले. या भागात तापमान 3 ते 8 अंशांनी घसरल्याचे समोर आले आहे. त्यानुसार हा पारा 10 अंशाखाली जाताना दिसतोय. त्यानुषंगाने 6.2 निचांकी तापमानाची राज्यात नोंद करण्यात आली आहे. तर सध्या आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, अमरावती, नागपूर, वाशिम, गोदिंया येथील पारा 11 अंशांपेक्षाही खाली गेल्याचे दिसत आहे.
📢 Weekly rainfall forecast 18 – 25 November 2025
🌧️⛈️ Moderate rainfall (50-200mm) expected over #Burundi, western #Rwanda, western #Tanzania, eastern #Kenya and parts of southern #Somalia.
Details 👉🏾 https://t.co/THmOpa2H8p#rainfall #forecast pic.twitter.com/3OpUKixeI1
— ICPAC (@IGAD_CPAC) November 18, 2025
भारतीय हवामान खात्याचा इशारा (IMD rain alert)
भारतीय हवामान खात्याने 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर काही भागात वादळ, विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.












