मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दादरचा कबुतरखाना बंद केल्यावर जैन समाजाच्या नाराजीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “कबुतरांमुळे होणारे रोग लक्षात घेऊन कोर्टाचा आदेश सगळ्यांनी मानावा, जैन मुनींनाही हे समजलं पाहिजे,” असे ते म्हणाले. कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली. मंत्री मंगलप्रभात लोढांवर टीका करत “ते राज्याचे मंत्री आहेत, समाजाचे नाहीत” असेही ठाकरे म्हणाले.












