मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या सोग्रस येथे भरधाव छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू, तर 10-12 विद्यार्थी जखमी झाले असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर चांदवड उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली असून, मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.












