Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

लस टोचली चक्कर आली अन् खेळ संपला! श्रावणी सोबत नेमकं काय घडलं? पाहा

Nashik Vaccination Death Shravani
Nashik Vaccination Death Shravani: महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात एका मुलीने लस घेतली त्यानंतर काही वेळातच तिला चक्कर आली ति जमिनीवर कोसळली, आणि तिचा मृत्यू झाला.. कोणाला विश्वासही बसणार नाही अशी घटना समोर आली…. काय आहे प्रकरण ? कोणती लस होती ? कशामुळे मृत्यू झाला ? पाहूयात या आजच्या खास लेखातून

नाशिक शहरातल्या सिडको परिसरातील खुटवडनगर भागात दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिराच्या परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शाळा आणि परिसरातील किशोरवयीन मुलामुलींना धनुर्वात म्हणजेच टीटी आणि घटसर्पाची प्रतिबंधक लस देण्याचं काम चालू होतं… अनेक पालक आपल्या मुलांना तिथे घेऊन येत होते. त्याच परिसरामध्ये राहणारी १७ वर्षांची श्रावणी अनिल पाटील ही तरुणी सुद्धा लसीकरणाला पोहोचली.

हेही वाचा: सायंकाळी ४ वाजता कुरकुरे किंवा चिप्स रोज खाताय? थांबा… आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

लसीकरण केंद्रावर काय घडलं?

तिचे वडील तिला घेऊन दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास खुटवडनगरच्या त्या लसीकरण केंद्रावर पोहोचले ती पूर्णपणे चालती-बोलती आणि निरोगी अवस्थेत तिथे आली होती. आरोग्य कर्मचाऱ्याने श्रावणीला धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस दिली. ती लस घेऊन तिथून बाहेर पडली. लस घेतल्यानंतर ती शेजारीच असलेल्या एका दुकानात जात असतांना. अवघ्या काही मिनिटांत अचानक श्रावणीच्या पायातील ताकद निघून गेली. तिचे डोके प्रचंड गतीने गरगरू लागले आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. काही समजण्याच्या आतच चक्कर आली. आणि ति जमिनीवर कोसळली…

आजूबाजूचे प्रत्यक्षदर्शी, मेडिकल दुकानदार आणि रस्त्यावरून जाणारे नागरिक धावत तिथे आले. तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. अशी प्राथमिक माहिती आहे, त्यानंतर तिला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. एका क्षणात हसती खेळती मुलगी मृत्यूच्या दारात पोहोचली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात तिला नेले आणि डॉक्टरांनी सांगितलं कि, रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तिला ब्रॉट डेड घोषित केले.

लस टोचली आणि मुलगी मरून पडली

अवघ्या अर्ध्या तासापूर्वी जी मुलगी आपल्यासोबत चालत आली होती, ती आता पांढऱ्या चादरीत गुंडाळलेली मृतदेह बनून पडली होती. या धक्कादायक घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण नाशिक शहरात पसरली. महापालिकेच्या लसीकरण शिबिरात लस टोचली आणि मुलगी मरून पडली, ही बातमी ऐकून नागरिक संतप्त झाले आणि भीतीचे वातावरण पसरले. मात्र श्रवणीच्या नेमकं मृत्यूच कारण अद्याप देखील समोर आले नाही.

मृत्यूचे कारण काय?

श्रावणीचा विसेरा आल्यावर तिच्या मृत्यूचे कारण समोर येईलच.. पण ज्या बॅचमधील लस श्रावणीला देण्यात आली होती, त्याच बॅचमधून परिसरातील इतर अनेक मुलांनाही लस देण्यात आली आहे आणि इतर कोणत्याही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे लस खराब असण्याची शक्यता प्राथमिक दृष्ट्या कमी आहे. या मृत्यूमागे नक्की काय कारण असू शकते, पहिला आणि सर्वात मोठा संशय वॅसोव्हॅगल सिंकोप नावाच्या वैद्यकीय स्थितीवर व्यक्त केला जात आहे. अनेकदा तरुण मुला-मुलींमध्ये सुईची म्हणजेच इंजेक्शनची प्रचंड भीती असते. लस टोचताना होणारी वेदना किंवा मनातील भीती यामुळे शरीरातील मज्जासंस्था अचानक उद्दीपित होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके क्षणभर मंदावतात आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर अत्यंत खालच्या पातळीवर घसरते. अशा स्थितीत मेंदूला होणारा रक्तपुरवठा काही सेकंदांसाठी थांबतो आणि व्यक्तीला तीव्र चक्कर येते. श्रावणीच्या बाबतीतही असेच घडले असावे का ?

लसीमधील घटकाची तीव्र ॲलर्जी

दुसरा संशय लसीच्या रिॲक्शनवर म्हणजेच ॲनाफिलेक्टिक शॉकवर घेतला जात आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये असे मानले जाते की, कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीची शारीरिक रचना अशी असते की तिला विशिष्ट औषधाची किंवा लसीमधील घटकाची तीव्र ॲलर्जी असते. जर श्रावणीला त्या टिटॅनस किंवा घटसर्पाच्या लसीची तीव्र ॲलर्जी असेल, तर लस शरीरात जाताच अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण शरीरात विष पसरल्यासारखी स्थिती निर्माण होते. श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो, रक्तदाब वेगाने कोसळतो आणि हृदयाचे ठोके थांबतात. याला वैद्यकीय भाषेत ॲनाफिलेक्टिक शॉक म्हणतात. जर श्रावणीला अशी रिॲक्शन आली असेल, तर त्यामुळेच तिला चक्कर आली आणि तिचा मृत्यू झाला, असा नातेवाईकांचा ठाम दावा आहे.

श्रावणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन

तिसरा पैलू म्हणजे श्रावणीच्या पूर्व इतिहासाचा तपास करणे. ती लसीकरण केंद्रावर येण्यापूर्वी तिची तब्येत कशी होती, तिने सकाळी काही खाल्ले होते की नाही, किंवा तिला आधीपासूनच काही हृदयविकार अथवा इतर छुपा आजार होता का, याचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत. जर रिकाम्या पोटी किंवा प्रचंड उन्हात ती आली असेल आणि त्यात इंजेक्शनची भीती जोडली गेली असेल, तर त्यामुळेही ही दुर्घटना घडली असू शकते. या संपूर्ण गूढ आणि संवेदनशील प्रकरणाचे सत्य शोधण्यासाठी श्रावणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे…

दुखापत बातमी समोर आली

प्राथमिक शवविच्छेदन अहवालात डोक्याला लागलेला मार आणि अंतर्गत दुखापत समोर आली असली, तरी मृत्यूचे अंतिम कारण अजूनही राखून ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी श्रावणीच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे नमुने म्हणजेच व्हिसेरा सुरक्षित केला असून तो रासायनिक विश्लेषणासाठी पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. या व्हिसेरा अहवालातूनच हे स्पष्ट होईल की तिच्या रक्तात लसीचे काही विषारी घटक किंवा तीव्र रिॲक्शनचे पुरावे आहेत का. दुसरीकडे, नाशिक महानगरपालिका आणि राज्य आरोग्य विभागाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. तसेच वापरण्यात आलेल्या लसीच्या संपूर्ण बॅचचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. जोपर्यंत या सर्व समित्यांचा आणि फॉरेन्सिक लॅबचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत श्रावणीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, यावर शिक्कामोर्तब करणे कठीण आहे. पण या संपूर्ण घटनेने देशातील आणि राज्यातील लसीकरण मोहिमांच्या सुरक्षेबाबत आणि प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पहिला प्रश्न असा की, कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिल्यानंतर रुग्णाला किंवा नागरिकाला किमान ३० मिनिटे तिथेच बसवून ठेवणे बंधनकारक असते. लस दिल्यानंतर काही रिॲक्शन येते का, किंवा चक्कर येते का, हे पाहण्यासाठी हा अब्झर्वेशन पिरियड अत्यंत महत्त्वाचा असतो. मग श्रावणीला लस दिल्यानंतर तात्काळ बाहेर का जाऊ दिले गेले? जर तिला काही मिनिटे तिथेच बसवून ठेवले असते आणि केंद्राच्या आतच चक्कर आली असती, तर कदाचित ती सिमेंटच्या रस्त्यावर आदळली नसती आणि तिचा जीव वाचला असता का? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या नियमाचे पालन का केले नाही, हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा: केतनला ढकललं तिथूनच सियाला ढकलून द्या’ सियाची आई संतापली!

तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली असती

दुसरा प्रश्न लसीकरण केंद्रांवरील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा आहे. जर एखाद्या मुलाला लसीची रिॲक्शन आली किंवा चक्कर आली, तर त्या केंद्रावर तात्काळ प्रथमोपचार करण्यासाठी एड्रेनालाईन सारखी जीवरक्षक औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध होता का? जर तिथे तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली असती, तर जिल्हा रुग्णालयात नेण्याचा वेळ वाचला असता आणि कदाचित श्रावणी आज आपल्यात असती. नाशिकमधील खुटवडनगर येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोरील तो सिमेंटचा रस्ता आज एका कुटुंबासाठी कधीही न भरून निघणारे दुःख देऊन गेला आहे. एका लाडक्या आणि अवघ्या १७ वर्षांच्या मुलीचा असा अचानक झालेला अंत संपूर्ण समाजाला चटका लावून गेला आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या व्हिसेरा अहवालमध्ये काय समोर आले?

ही घटना लसीकरणाच्या रिॲक्शनमुळे झाली की केवळ एक दुर्दैवी अपघात होता, याचे उत्तर लवकरच सरकारी तपासातून समोर येईल. श्रावणी पाटील हिचा मृत्यू एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा उध्वस्त झालेला आधार आहे. आता संपूर्ण नाशिककरांचे आणि महाराष्ट्राचे लक्ष फॉरेन्सिक लॅबच्या व्हिसेरा अहवालाकडे लागले आहे, जेणेकरून या निष्पाप मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळू शकेल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts