पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्या टर्मिनलमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ने प्रवाशांसाठी मोफत ग्रंथालय सुरू केलं आहे. प्रतीक्षा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या ग्रंथालयात सध्या 100 हून अधिक पुस्तकं आहेत कथा, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, प्रादेशिक साहित्य अशा विविध प्रकारात. कोणतीही नोंदणी किंवा शुल्क न घेता प्रवासी पुस्तक निवडून वाचू शकतात. एअरपोर्ट डायरेक्टर संतोष ढोके यांनी याला “प्रवासात ज्ञानाची जोड” असल्याचं सांगितलं असून, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार संग्रह वाढवला जाणार आहे. ग्रंथप्रेमींकडून या उपक्रमाचं जोरदार स्वागत होत आहे.












