पुण्यात तीन दलित मुलींवर पोलिसांकडून जातीय शिवीगाळ, मारहाण व वॉरंटशिवाय चौकशीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पीडितांनी 15 तास आयुक्तालयात ठिय्या दिला. वंचित नेते सुजात आंबेडकर व आमदार रोहित पवार यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत आयुक्तालयात ठाण मांडलं. तरीही पोलिस प्रशासनाने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रोहित पवार यांनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.












