PMPML पुण्यात इलेक्ट्रिक डबल-डेकर बस सेवा सुरू करणार असून सुरुवातीला हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी IT पार्क परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा राबवली जाणार आहे. लंडनच्या रेड बसेससारख्या डिझाइन, वातानुकूलित सुविधा, डिजिटल तिकीट प्रणाली आणि 100 पेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसेस प्रत्येकासाठी आकर्षण ठरणार आहेत. एक बस सुमारे 2 कोटींची असून, देखभाल खर्च कमी असेल, असा PMPML चा विश्वास आहे












