पुण्यात पोलिसही सुरक्षित नाहीत!
पुण्यातील खडकी भागात गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चार जणांच्या टोळक्याने मारहाण केली. गाडी वेगात चालवल्याचा जाब विचारल्याने वाद निर्माण झाला. गोपाल कोतवाल आणि काजळे हे पोलिस जखमी झाले असून, जुनेद, नफीज, युनूस आणि आरिफ शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.












