Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ई-गव्हर्नन्समध्ये पुणे जिल्हा परिषदेने फडकावली यशाची पताका; राज्यात अव्वल
Pune

ई-गव्हर्नन्समध्ये पुणे जिल्हा परिषदेने फडकावली यशाची पताका; राज्यात अव्वल

pune zp

Pune Zilla Parishad’s E-Governance: पुणे जिल्हा परिषदेने ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात यशाची पताका फडकावली आहे. राज्यात अव्वल क्रमांक पटकावत इतर जिल्हा परिषदेसमोर एक आदर्शाचा वस्तुपाठ घालून दिला आहे. २०० पैकी तब्बल १९६.२५ गुण मिळवत जिल्हा परिषदेने अव्वल स्थान मिळवले. सेवाकर्मी कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची प्रथम आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnvis) यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (gajanan patil) यांचा सत्कार करण्यात आला. सहयाद्री अतिथी गृहात (Sahyadri Guest House) हा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा: सावधान…! राज्यात उद्यापासून गारपीट

कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन

राज्यात सरकारी कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले. यात सात निकष ठरवण्यात आले होते. भौगोलिक माहिती प्रणाली, आपले सरकार, प्रणाली, ई-ऑफिस, व्हॉट्सअॅप, चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संकेतस्थळ, कार्यालयीन डॅशबोर्ड, व ब्लॉकचेनचा वापर या घटकांमध्ये जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यातील जिल्हा परिषदांना मागे टाकत पुणे जिल्हा परिषदेने अव्वल क्रमांक पटकावला.

गजानन पाटील यांचे मार्गदर्शन

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. क्यूआर कोड आधारित करसंकलन प्रणाली, इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिम, ई-लॉटरी, सिस्टम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन, स्पंदन यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.

निर्णय प्रक्रियेला चालना

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ द्विभाषिक व सुरक्षित आहे. शंभर टक्के सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आपले सरकार प्रणाली वापरण्यात आली आहे. परिणामी कागद विरहित प्रणाली मोठी विकसित झाली आहे. तशी गती मिळाली आहे. हजारो प्रकरणे निकाली काढण्यात गती आली आहे. स्मार्ट डॅशबोर्डमुळे डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली आहे. दरम्यान, या यशाचे श्रेय देताना पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

लोकांचा वेळ वाचणार

डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. प्रशासनाला अधिक लोकाभिमुकता प्राप्त होणार आहे. दरम्यान, ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात यशाची पताका फडकवल्याने जी.प.अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सर्व कर्मचाऱयांचे अभिनंदन केले आहे. अनेक मान्यवरांनी याचे कौतुक करताना जिल्हा परिषदेने अशीच कामगिरी करावी व जिल्हा परिषदेचे नाव सातत्याने उंचवावे अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या यशाची प्रमुख वैशिष्ट्ये

सर्वोच्च गुण: १५० दिवसांच्या विशेष मोहिमेत २०० पैकी १९६.२५ गुणांसह राज्यात अव्वल स्थान.
डिजिटल उपक्रम: ई-ऑफिस प्रणाली, ‘पुणे झेडपी संवाद’ व्हॉट्सॲप चॅटबॉट, आणि एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
पारदर्शक प्रशासन: ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे १०० टक्के सेवा ऑनलाइन आणि ‘स्मार्ट डॅशबोर्ड’द्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया.
पुरस्कार: मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts