Pune zoo ticket price hike – पुणे महापालिकेने प्राणिसंग्रहालयाचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने = भारतातील लोकप्रिय प्राणीसंग्रहालयांपैकी एक असलेले राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे तिकीटदर वाढवण्यात आले असून नवीन तिकीट प्रणाली महापालिकेने जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे प्रसिद्ध आहे. या प्राणिसंग्रहालयात विविध ठिकाणावरून यात्रेकरू येत असतात. लहान मुलांसह पर्यटकांची याठिकाणी प्रचंड गर्दी होते. पुण्याच्या पर्यटनामध्ये कात्रज प्राणीसंग्रहालयाचा महत्त्वाचा रोल आहे. आता या प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.
या निर्णयात्मक प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मान्यता मिळाली. यामुळे आता तब्बल सात वर्षानंतर प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार हा निर्णय 1 डिसेंबर 2025 पासून अंमलात आणल्या जाणार आहे.
हे ही वाचा – लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
का घेतला निर्णय
सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेले हे प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरु असून त्यासाठी अत्यावश्यक निधीची गरज आहे. या विस्तारीकरणासाठी झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नवीन प्रजातीची प्रदर्शन ठिकाणे उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्राण्यांच्या आहार, सेवकांचे वेतन, खंदक देखभाल-दुरुस्ती आणि मास्टर प्लॅननुसार विकास प्रकल्पांसाठी मोठा खर्च लागणार आहे. याच कारणाने तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे.
जाणून घ्या काय असेल दर (Pune zoo ticket price hike)
नवीन तिकीट प्रणालीनुसार लहान मुलांचे तिकीट 10 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. तर प्रौढांचे तिकीट 40 रुपयांवरून 60 रुपये आणि विदेशी पर्यटकांचे तिकीट 100 वरून 150 रुपये करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांचे तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आले आहे.












