पुण्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. खास करून हिंजवडी परिसरात जाताना नागरिकांचे वाहतूकीमुळे प्रचंड हाल होतात. आता हिंजवडी परिसरात होणारे नागरिकांचे हाल थांबणार आहेत. कारण लवकरच शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सुरु होणार आहे. यासाठी ट्रायल रन यशस्वीरीत्या पार पडली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी पर्यंत प्रवास करणार असणार तर आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मेट्रो लाईन्सचे काम 87 टक्क्यांपर्यंत झाले असून ट्रायल रन देखील यशस्वी झाली आहे. म्हणजे आता मार्च 2026 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्यता आहे. यामुळे शिवाजी नगर ते हिंजवडी प्रवास करणे सहज शक्य होईल.
2026 मध्ये सुरु होणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असणार आहेत. एवढंच नाही तर खास करून या मेट्रोमध्ये सर्व लोको पायलट महिला असणार आहे. या क्षेत्रात देखील आता आपल्याला महिला अग्रेसर दिसतील. या मेट्रो मार्गिकेचे व्यवस्थापनाची जबाबदारी फ्रेंच कंपनीला देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडसोबत फ्रेंच कंपनी केओलिसने करार केला असून 23 स्थानकांच्या तिकीट व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांची असणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गासाठी तब्बल 18 हजार 313 रुपये खर्च आला असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मार्गिकेवर ट्रायल रन यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता जड बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या मार्गिकेमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर 35 ते 40 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.