Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
ताज्या बातम्या

एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

Imtiaz Jaleel Casts Vote

Imtiaz Jaleel Casts Vote : महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाला आज सकाळी 7.30 वाजेपासून सुरुवात झाली आहे. अनेक राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली असून अनेक मतदार केंद्रांवर योग्य सोयीसुविधा नसल्याचे दिसून आले आहे. याचा सामना छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी देखील केला आहे.

मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

पाच वर्षानंतर इलेक्शन एकदा येते, लोकांना आपली निशाणी आणि नावे शोधून मतदान करावं लागत आहे, त्यांना काही अडचण येऊ नये, यासाठी इलेक्शन कमिशनने काळजी याबाबतीत दक्षता घेणे गरजेचे होते, मतदानाच्या ठिकाणी लाईटची सुविधा असणे गरजेचे होते, परंतु दुर्दैव आहे, इलेक्शन एक सिम्बॉलिक राहिलेला आहे, इलेक्शन हे कसं चाललेलं आहे हे आपल्याला माहित आहे, तरीसुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे कि, मतदान कोणाला करता येईल ते तुम्ही ठरवा कृपया शहराच्या विकासासाठी तुम्ही मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे.

कोणी लक्ष घालण्याचा विचार करत नाही

बहुतेक सत्ताधाऱ्या पक्षांना समजले असेल की याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे त्यांनी ते चेंज केलं असेल, सर्वत्र बोगस सिलेक्शन वोटिंग होत असून पैशाचा जास्त प्रमाणात होत आहे. याच्यामध्ये काय तोटे आहे, सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कोणी या लक्ष घालण्याचा विचार करत नाही,

कोणाला केले मतदान

मी चौघांनाही मतदान केले आहे, माझ्या पक्षातील दोन उमेदवार होते त्यांना तर स्वभाविक मी मतदान केले आहे. आणि बाकीचे दोन वेस्ट करण्याऐवजी माझ्या एरियामध्ये माझ्या परिसरामध्ये चांगलं काम करणारा कोण आहे मी अशा दोघांना मतदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नारेगावमध्ये पैसे वाटप

नारेगाव मध्ये काल जो राडा झाला तो कशामुळे झाला कारण तिथे एक कॅन्डीडेट पैसे घेऊन उभा होता, लोकांना पैसे वाटून तो त्यांचं इलेक्शन कार्ड घेत होता, गोरगरिबांचा याच्यामध्ये खूप फ्रॉड झाला असून बेगमपुरांच्या लोकांना मी सलाम करतो, जेव्हा लोक त्यांच्याकडे पैसे घेऊन गेले तेव्हा त्या सगळ्या महिला रस्त्याव उतरल्या. आणि त्यांनी सांगितलं आम्ही पैशांनी विकणार नाही आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts