छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी, मारहाणीप्रकरणी हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटा मध्ये प्रदेश सरचिटणीसपद देण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, सुनील तटकरेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या निर्णयावरून पक्षात आणि संघटनांमध्ये पुन्हा वाद पेटला आहे.












