अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय 67 वर्ष होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे देखील आहेत. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला करत विजय मिळवला होता.
कोण आहेत शिवाजीराव कर्डिले :
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार होते. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा अनेक पक्षातून त्यांनी काम केलं. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2009 ते 2014 असे सलग दहा वर्ष त्यांनी राहुरीचं विधानसभेत नेतृत्व केलं होतं. मात्र 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत त्यांना विजयाच्या हॅट्रीकपासून रोखलं होतं. मात्र, 2024 च्या निवडणुकीत या पराभवाची परत फेड करत कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंना पराभूत केलं होतं. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.