Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • CDR समोर? शिंदे-खरातचे १७ कॉल, चाकणकरांचे १७७ कॉल…
Top News

CDR समोर? शिंदे-खरातचे १७ कॉल, चाकणकरांचे १७७ कॉल…

Shinde Kharat CDR calls controversy

Shinde Kharat CDR calls controversy : नाशिकमधील भोंदू बाबा खरात प्रकरण आता अनेकांना गाळात नेणार असं दिसतंय. कारण खरातच्या सीडीआरमधून जी माहिती समोर आलीय. त्यातील खरातचे आणि नेत्यांचे कॉल पाहून तुम्हीही हादरून जाल. या नेत्यांचं नेमकं खरातकडे काय काम होतं? का या नेत्यांनी खरातला एवढे कॉल केलेत? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. नाशिकचा भोंदू बाबा आणि राजकीय कनेक्शन अधिक घट्ट होत चाललंय. कारण या प्रकरणात आता अंजली दमानियांनी खळबळजनक खुलासे केलेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारण खळबळ उडाली

नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स आधारे धक्कादायक दावे केले असून, यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे समोर आली आहेत.

एकनाथ शिंदे यांचे खरातसोबत एकूण १७ कॉल्स

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत खरातच्या सीडीआरमधील माहिती उघड करत असा दावा केला की, एकनाथ शिंदे यांचे अशोक खरातसोबत एकूण १७ कॉल्स झाले आहेत. यातील १० कॉल्स इनकमिंग तर ७ आऊटगोईंग होते. विशेष म्हणजे, एका कॉलवर या दोघांमध्ये तब्बल २१ मिनिटे सलग संभाषण झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. “एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा एका भोंदू बाबाशी इतका वेळ काय संवाद झाला? यात नक्की काय शिजले?” असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

चाकणकर यांच्या भगिनी यांचेही खरातला २३६ कॉल्स

या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे रुपाली चाकणकर, दमानिया यांच्या दाव्यानुसार, चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात तब्बल १७७ वेळा फोनवरून संभाषण झाले आहे. या संभाषणाचा एकूण वेळ ३३,७२७ सेकंद इतका आहे. केवळ इतकेच नाही, तर चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांचेही खरातला २३६ कॉल्स असल्याचे त्यांनी सांगितले. चाकणकर यांनी नाशिकमध्ये जाऊन खरातचे पाय पदराने पुसल्याचा फोटो दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

रुपाली चाकणकराचे राजीनामा सत्र

पण याच फोटोमुळे आणि व्हिडिओंच्या वाढत्या दबावामुळे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या त्यांना एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे, मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण देत हजर राहण्यास नकार दिला आहे.

तीर्थ देऊन महिलांवर जादूटोणा आणि लैंगिक शोषण

नाशिकचा हा स्वयंघोषित बाबा ‘ओशनो जल’ नावाचे तीर्थ देऊन महिलांवर जादूटोणा आणि लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. एका २७ वर्षीय महिलेने खरातवर बलात्कार आणि तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी असाही गंभीर आरोप केला आहे की, खरात त्याच्या ‘ओशनो जल’ या प्रसादात व्हायग्रा आणि कफ सिरप मिसळून तो भक्तांना देत असे.

दुबई ३०० कोटींच्या व्यवहाराची शक्यता

खरातची मालमत्ता १०० कोटींहून अधिक असल्याचे तपासात समोर आले असून, त्याचे दुबईशी संबंध आणि ३०० कोटींचे हवाला व्यवहार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीडीआरमध्ये केवळ शिंदे आणि चाकणकरच नाहीत, तर इतर अनेक नेत्यांची नावेही समोर आली आहेत, यातल्या नेत्यांची यादी मोठी आहे.

केसरकरांच्या निकटवर्तीयांचे खरातसोबत १८९ कॉल्स

यात भाजपा नेते चंद्रकांत पाटील ८ कॉल्स, राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे ८ कॉल्स, भाजपा नेते आशिष शेलार १ कॉल असल्याचे उघड झाले आहे. तसेच दीपक लोंढे हे दीपक केसरकरांचे निकटवर्तीय आहेत, त्यांचे १८९ कॉल्स खरातसोबत झाल्याचे बाहेर आले आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. पोलीस सध्या खरातच्या ३०० हून अधिक अश्लील व्हिडिओंची आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

खरातला वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर गप्प बसणार नाही – दमानिया

अंजली दमानिया यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर राजकीय दबावाखाली खरातला वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर त्या गप्प बसणार नाहीत. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे वादळ निर्माण केले असून, आगामी काळात आणखी अनेक बड्या नेत्यांचे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खरात तर पुराता गाळात गेलाच आहे, हा अनेक नेत्यांनाही घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात सर्वात जास्त धोकाअजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता खरात फाईल्सच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखी कुणाची पोलखोल होतेय, कुणाचा काय झोल बाहेर येतोय हेही, पाहाव लागणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts