Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका’; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना कडक इशारा 
Top News

‘आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका’; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना कडक इशारा 

Chandrakant Patil Ajit Pawar warning

Chandrakant Patil Ajit Pawar warning : ‘पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला. स्थानिक नेत्यांची राक्षसी भूक दिसून आली’ अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या टिकेनंतर आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना इशारा देण्यात येत आहे. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ‘आम्हाला दमात आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील आमच्याकडेच आहे’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे.

हेही वाचा – ‘आम्हाला बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायचंय;’ एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

सध्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्य सरकारमध्ये एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे महायुतीतील नेते आता एकमेकांच्या विरूद्ध उभे टाकले आहेत. त्यामुळे आपापल्या पक्षातील उमेदवारांसाठी केलेल्या वक्तव्याने अजित पवार गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडल्याचं समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपची सर्व टीम त्यांच्यावर तुटून पडल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांना सोबत घेतल्याचा पश्चाताप असल्याचं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील तोंडसुख घेतलं आहे.

ही निवडणूक आपल्याला विकासावर न्यायची आहे – चंद्रकांत पाटील

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासमोर निवडणुकीचं एक धोरणं मांडलं. ही निवडणूक आपल्याला विकासावर न्यायची आहे. महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर अजिबात टीका करायची नाही. मात्र, टीका करायला सुरुवात झाली. ही टीका किती चालणार? कुठे थांबणार? याचा अंदाज घेऊ. मागच्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत टीका करणाऱ्यांनी म्हटलं होतं की तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, त्यानंतर मी भोरमधील एका सभेत म्हटलं होतं की तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच..

“मी आता असं म्हणेन की, ‘ये घरला जायचयं का?’ असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो की, मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका”, असा अप्रत्यक्ष इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts