Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कोकाटे आऊट, मुंडे इन? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट
Top News

कोकाटे आऊट, मुंडे इन? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

Dhananjay Munde meets Amit Shah

Dhananjay Munde meets Amit Shah : खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील काही सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवलं आहे. या निकालानंतर आता नाशिक पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात अटकेचा वारंट जारी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे. तर तिकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यानी दिल्लीत जाऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार असून धनंजय मुंडे हे सरकारमध्ये सहभागी होण्यार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

हेही वाचा – क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे कसे अडकले? बंदुकीचा परवाना अन् अल्प उत्पन्न हा विरोधाभास घेऊन गेला 2 वर्षांच्या शिक्षेच्या दिशेने संपूर्ण घटनाक्रम

मंत्री कोकाटे यांच्या नावे अटक वारंट जारी होताच ते नाॅट रिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, काही तासानंतर ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. त्यानंतर कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाता धाव घेतली आहे. या प्रकरणी शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे या सर्व घडामोडी घडत असताना आता माजी मंत्री धनंजय मुंडे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकीकडे यांचे मंत्रीपद धोक्यात आलेले असतानाच मुंडे दिल्लीच्या दौर्‍यावर आहेत.

 तेव्हाही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे? हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आलेले असतानाच धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळातील सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसून आले होते. तेव्हाही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीदेखील धनंजय मुंडे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता धनंजय मुंडे थेट दिल्लीला गेले आहेत.

उच्च न्यायालयात शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सुनावणी

दुसरीकडे माणिकरा कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते असे सांगितले जात आहे. कोकाटे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर आता शुक्रवारी दि. १९ डिसेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. महायुतीमध्ये आता कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर त्याची जागा कोणाला द्यावी, यावरही आता चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts