कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांच्या सहभागातून १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा व वृक्षारोपण कार्यक्रम रंगला. हजाराहून अधिक झाडे लावण्यात आली, तर विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून देशभक्तीचा संदेश दिला. विशेष म्हणजे पालिकेकडून भारतातील बारा किल्ल्यांची ‘हेरिटेज’ म्हणून नोंद झाल्याने, त्या किल्ल्यांची प्रतिकृतींचे प्रदर्शन पालिकेत आयोजित करण्यात आले. नागरिकांनी हे प्रदर्शन पाहून किल्ल्यांची ओळख करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.












