Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • सामान्यांना महागाईचा फटका, घरचा सिलेंडर 60 रु. तर व्यावसायिक 115 रुपयांनी महागला..
Top News

सामान्यांना महागाईचा फटका, घरचा सिलेंडर 60 रु. तर व्यावसायिक 115 रुपयांनी महागला..

Cylinder price has increased

Cylinder price has increased  : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या संघर्षामुळं मात्र प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेल्या देशांनाही या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय. अशातच आता युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून जगासमोर नवं संकट निर्माण झालं आहे. त्याची झळ अगदी भारताला देखील बसू लागली आहे. अशातच आता राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, महाराष्ट्रात 860 रुपयांना मिळणारा सिलेंडर गॅस आता 920 रुपयांना मिळणार आहे. आजपासून हे दर लागू होणार असल्याची माहिती आहे. 14.2 किलोच्या घरघुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून हि दरवाढ लागू होणार आहे.

इराण-इस्रायल युद्धाच्या वणवा भारतातही

मध्यपूर्वेच्या युद्धाची आग आता हळूहळू जगभर पसरू लागली आहे. इराण आणि इस्रायल एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत, तर दुसरीकडे इराण-इस्रायल युद्धाच्या वणवा भारतातही पसरला आहे. लोक साखर झोपेत असताना तेल कंपन्यांनी सर्वसामान्य लोकांना दुहेरी धक्का दिला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.

33.15 दशलक्ष मेट्रिक टन स्वयंपाकाच्या गॅसचा वापर

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयात करणारा देश आहे. गेल्या वर्षी, देशाने अंदाजे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन स्वयंपाकाच्या गॅसचा वापर केला. एलपीजी हे प्रोपेन आणि ब्युटेनचे मिश्रण आहे. देशाच्या एकूण एलपीजी गरजांपैकी जवळजवळ दोन तृतीयांश गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात, या पुरवठ्यापैकी अंदाजे 85-90% मध्य पूर्वेतून येतात. अशातच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं जागतिक बाजारपेठेतील जवळजवळ सर्वच क्षेत्रापुढं नवी समस्या निर्माण झाली आहे. अशातच घरघुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी वाढल्यामुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत

इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागलीय. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरींना, एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. पण युद्ध असंच सुरू राहिल्यास, घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात, अशी भीती देखील आता भेडसावू लागली आहे.

१४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रूपयांनी वाढले

इराण-इस्त्राइल आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतामध्ये बसण्यास सुरुवात झाली आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रूपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ११५ रूपयांची वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात नवे दर आजपासून लागू झाले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर गॅस दरवाढीचा परिणाम झाला आहे.

कोलकात्यामध्ये सिलिंडरचे दर ३० रूपयांने वाढले आहेत

मिडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रूपयांवरून ९१३ रूपये इतकी झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचे दर ८५२.५० रूपयांवरून ९१२.५० रूपये इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये सिलिंडरचे दर ३० रूपयांने वाढले आहेत. तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरचे दर ८६८.५० रूपयांहून ९२८.५० रूपये इतकी झाली आहे. एप्रिल २०२५ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता, दर स्थिर होते. वर्षभरानंतर एलपीजी सिलिंडरचे दर बदलले आहेत.

एप्रिल 2025 नंतर घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला असून नवीन वाढीचा परिणाम घरगुती ग्राहक आणि दैनंदिन कामकाजासाठी एलपीजीवर अवलंबून असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक आस्थापनांवर होईल.

दरम्यान, अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा पुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल व्यापक चर्चा सुरू असताना, विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक तेल मार्गांमध्ये संभाव्य व्यत्यय येण्याची चिंता वाढत असताना, किमतीत वाढ केली गेली आहे. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यापूर्वी ग्राहकांना देशाच्या ऊर्जा सुरक्षेबद्दल आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

“आमच्या नागरिकांना परवडणाऱ्या आणि शाश्वत इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही सुरळीत करत आहोत. भारतात ऊर्जेची कमतरता नाही आणि आमच्या ऊर्जा ग्राहकांसाठी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही,” पुरी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलंय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts