Mayor Reservation : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज मंत्रालयात पार पडली. 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला होता. यानंतर महापालिकेतील सत्तेचं समीकरण निश्चित करण्यासाठी या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. ठरल्याप्रमाणे आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. या सोडतीमुळं अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
15 महापालिकांवर असणार महिलाराज :
राज्यात 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळं राज्यातील 15 महापालिकांवर महिलाराज असणार आहे. तर उर्वरित 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार असल्याचं समोर आलंय.
महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण :
- अनुसूचित जमाती – 1
- अनुसूचित जाती – 3
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
- सर्वसाधारण – 17
महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर (Mayor Reservation declared) :
छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
नवी मुंबई: सर्वसाधारण
वसई- विरार: सर्वसाधारण
कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
कोल्हापूर: ओबीसी
नागपूर: सर्वसाधारण
बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
सोलापूर: सर्वसाधारण
अमरावती: सर्वसाधारण (महिला)
अकोला: ओबीसी (महिला)
नाशिक: सर्वसाधारण
पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
पुणे: सर्वसाधारण
उल्हासनगर: ओबीसी
ठाणे: अनुसूचित जाती
चंद्रपूर: ओबीसी (महिला)
परभणी: सर्वसाधारण
लातूर: अनुसूचित जाती (महिला )
भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
मालेगाव: सर्वसाधारण
पनवेल: ओबीसी
मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
जळगाव: ओबीसी (महिला)
अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
धुळे: सर्वसाधारण (महिला)
जालना: अनसूचित जाती (महिला)
इचलकरंजी: ओबीसी







