बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात स्वतः जाणून घडलेल्या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेतला.
दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार काल म्हणजे 16 सप्टेंबर रोजी घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नेमकं हा रंग कोणी टाकला याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तर संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मनसेप्रमुख राज ठाकरे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटाने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात जिथे मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली याचिवही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. यावेळी स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर आणि किशोरी पेडणेकर हे देखील राज ठाकरे सह उपस्थित होते. लवकरच या परिसरात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील आढावा घेण्यासाठी येणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची संपूर्ण माहिती घेतली आहे.
मुंबई येथील दादर येथे शिवाजीनगर परिसरात मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या परीसरात घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक जमले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी या पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई केली आहे. हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर या परिसरातील आमदार, खासदार आणि काही शिवसैनिक दाखल झाले आहेत. शिवसैनिकांनी या परिसरात पडलेला संपूर्ण लाल रंग पुसून काढला असून साफसफाई देखील केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी पुतळ्याजवळ जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी पुतळ्याजवळ असलेले सीसीटीव्ही चालू आहेत का..? असा सवाल पोलिसांना केला. तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करून 24 तासांच्या आत आरोपीला शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. यासह पोलिसांकडून अज्ञातांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कोण आहे मीना ठाकरे
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी म्हणजेच मीना ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि मीना टाकणारे यांचा विवाह 13 जून 1948 साली झाला होता. त्यांना बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे हे तीन अपत्य आहे. मीनाताई ठाकरे यांचे 1995 साली निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा अर्धकृती पुतळा दादर येथील शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात आला.