MVA Mumbai rally permission : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी आणि याद्यांमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडीसह मनसेने एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर रोजी १ वाजता होणार्या मोर्च्यासाठी परवानगीचे निवेदन देण्यासाठी मविआच्या शिष्टमंडळाने आज मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यावेळी अरविंद सावंत, अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड, बाळा नांदगावकर आदी नेते उपस्थित होते.
सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीकरिता येत्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या कार्यालयावर मनसे-महाविकास आघाडीकडून विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील डावे पक्ष, हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असून, या मोर्चात मोठ्या संख्येने भागीदारी करण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी एकमताने घेतला आहे.
मतचोरी, लबाडी, खोट्या नोंदी या विरोधात मोर्चा
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जे मतचोरी, लबाडी, खोट्या नोंदी झाल्यात त्या विरोधात १ तारखेच्या मोर्चा संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांना मोर्चासंदर्भात सर्व माहिती देण्यात आलीय. आमचा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून निघणार असून तो एन. एस. सी. आय. डोम, वरळी समाप्त होईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांमध्ये होत असलेला घोळ आणि निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘सत्याचा मोर्चा’बाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार), कम्युनिस्ट पक्ष,… pic.twitter.com/lxIx1CbTPn
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2025
कुठल्याही परिस्थितीत चार पूर्वी मोर्चा संपणार
हा मोर्चा मुंबईकरांच्या हितासाठीच आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी चारच्या आत हा मोर्च्या संपवायचा आहे. मतदार चोरी यातून लोकशाही मारली जाते. मात्र, त्याचबरोबर येथील नागरीकांना त्रास होणार नाही त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत ४ पूर्वी हा मोर्च्या संपवण्यात येईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
हे हि वाचा : armers funds Fadnavis announcement : पुढच्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; मुख्यमंत्री फडणवीस
मेट्रोचे दरवाजे उघडे ठेवा; बाळा नांदगावकर
मेट्रो आयुक्तांना एक विनंती आहे, मेट्रोमध्ये जे पदाधिकारी आणि नागरीक येणार आहेत याची काळजी घ्यावी. मेट्रोचे जे दरवाजे जे चालू बंद होतात ते उद्याच्या दिवस कायमचे उघडे ठेवले तर बरं होईल. नाहीतर गर्दीमुळे एखादी नाही ती घटना घडण्याची शक्यता असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.












