Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही टोकच नाही;” नितेश राणे यांचा हल्लाबोल
Top News

“काँग्रेसच्या निर्लज्जपणाला काही टोकच नाही;” नितेश राणे यांचा हल्लाबोल

Nitesh Rane attack on Congress

Nitesh Rane attack on Congress : आज प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे की, दादांसारखा एक ताकदीचा नेता आपल्याकडून निघून गेल्यामुळे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे. म्हणून बारामती पोटनिवडणूक (Baramati By-election)  बिनविरोध व्हावी, ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण काँग्रेसच्या (Congress) निर्लज्जपणाला काही टोकच नाही, असा हल्लाबोल मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांच्यावर केला आहे.

हेही वाचा – बारामतीतील अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाला अजित पवार यांचे नाव दिलेला जीआर अखेर रद्द

त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील

​शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. अजित दादांसारखा एक मोठा नेता जेव्हा आपल्यातून निघून गेला, तर सगळ्यांनी बिनविरोध ती सीट करणे ही एक भावना आहे. त्या पद्धतीची महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता त्या चौकटीत जर काँग्रेसवाले बसत नसतील, तर ते त्यांच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रदर्शन करतायेत, असे राणे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार

हिंदू नवीन वर्षाच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला अजून ताकद देणे, सक्षम करणे आणि पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवणे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुख्य संकल्पना आहे. ​आणि म्हणून आज सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये हे नवीन वाहनं जे आम्ही जिल्हा नियोजनाच्या निधीच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्याचे हस्तांतरण गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले, आल्याचे राणे म्हणाले.

आंबा, काजू नुकसान भरपाई देण्यास सरकार सज्ज

जसं आंबा आणि काजू संदर्भात गेल्या तीन दिवसांपूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री फडमवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. निसर्गामुळे जे काही नुकसान होतंय, प्रामुख्याने आंबा-काजू या संदर्भात, अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसान भरपाई म्हणा किंवा सरकारची मदत म्हणा, आम्ही देण्यासाठी सज्ज आहोत. त्या पद्धतीची तयारी सरकार म्हणून आम्ही करतोय, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts