Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री
Top News

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांची विक्री

Crowd of citizens purchasing nomination forms during the Pimpri Chinchwad Municipal Corporation election process.

PCMC election nomination forms : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्रे नेण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 8 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 2212 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज अ, ब, क, ड, इ, फ, ग ह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 2212 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

हे ही वाचा : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! २६ तारखेला अजित पवार अधिकृत घोषणा करणार..

आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभागनिहाय विक्री झालेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या –

अ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे ६८, ७८, ६७, १४३ अशा एकूण ३५६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ब क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ७९, ९६, ४८, ७७ अशा एकूण ३०० अर्जांची विक्री झाली आहे.

क क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ६५, २३, ८४, १४३ अशा एकूण ३१५ नामनिर्देशन पत्रांची अर्जांची झाली आहे.

ड क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ८५, ९०, ३४, ८३ अशा एकूण २९२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

इ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे ६९, ४८, ५५, ३८ अशा एकूण २१० नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

फ क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे ३५, ८५, २३, ९१ अशा एकूण २३४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ग क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे ४२, ४५, ४३, ५९ अशा एकूण १८९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

ह क्षेत्रीय कार्यालय – प्रभाग क्र. ३२, ३१, ३०, २० साठी अनुक्रमे ५१, ८३, ११७, ६५ अशा एकूण ३१६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts