Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट, ऐनवेळी उमेदवार बदलला
Pune

पिंपरी-चिंचवडमध्ये उपमहापौर पदाबाबत मोठा ट्विस्ट, ऐनवेळी उमेदवार बदलला

Pimpri Chinchwad Deputy Mayor Twist

Pimpri Chinchwad Deputy Mayor Twist : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत ऐनवेळी मोठा ट्विस्ट पाहायला (A major twist at the last moment) मिळाला. सुरुवातीला भाजपाकडून रवी लांडगे महापौर पदासाठी तर शितल शिंदे उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार असल्याची पत्रिका काढण्यात आली होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या क्षणातच संपूर्ण चित्र बदलले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटांआधीच शितल शिंदे यांचे नाराजी नाट्य समोर आल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर शितल शिंदे यांच्या ऐवजी शर्मिला बाबर यांनी उपमहापौर (Sharmila Babar replaced Shital Shinde as Deputy Mayor) पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अचानक बदलामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

हेही वाचा – हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवाच – मुख्यमंत्री फडणवीस

या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “नाराजी नाट्य असे काहीही नाही. शितल शिंदे यांना महापौर व्हायचे होते. मात्र पक्षाने ठरवलेल्या धोरणानुसार रवी लांडगे यांचे नाव महापौर पदासाठी पुढे करण्यात आले होते. तर शितल शिंदे यांना उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.”

शितल शिंदे उपमहापौर पदासाठी इच्छुक नसल्याचा दावा

भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शितल शिंदे हे उपमहापौर पदासाठी इच्छुक नसल्यामुळेच पक्षाने शर्मिला बाबर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. यामुळे काही काळासाठी भाजपामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी त्याला आता वेगळे वळण मिळत असल्याचे चित्र आहे. या घडामोडीनंतर भाजप शितल शिंदे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरणार का, तसेच त्यांना पक्षाकडून नेमकी कोणती जबाबदारी देण्यात येणार, यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

६ तारखेला महापौरपदावर शिक्कामोर्तब

दरम्यान, येत्या ६ तारखेला पिंपरी-चिंचवडचा नवा महापौर कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार असून, त्याच दिवशी महापौर आणि उपमहापौर पदाचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत घडामोडींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts