PM Modi slams opposition : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पराभवाच्या निराशेवर मात करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ज्याला ड्रामा करायचं आहे तो ते करु शकतो. इथं, ड्रामा नव्हे तर डिलीव्हरी असावी. धोरणांवर भर दिला पाहिजे, घोषणांवर नाही.” त्यांनी पुढं म्हटलं की हे अधिवेशन देशाच्या प्रगतीसाठी आहे आणि पराभवाबद्दलची निराशा व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ नये.
हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी संसद भवनात सांगितलं की हे अधिवेशन देशाला प्रगतीकडे नेण्याच्या प्रयत्नांना ऊर्जा देईल. भारतानं लोकशाही जगली आहे. वेळोवेळी, लोकशाहीवर विश्वास दृढ करणाऱ्या पद्धतीनं लोकशाहीचं प्रदर्शन केलं आहे. बिहार निवडणुकीत मतदारांची उपस्थिती ही लोकशाहीची एक मोठी ताकद आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi says, “The record voter turnout in the recent elections in Bihar is the greatest strength of democracy. The increasing participation of mothers and sisters is, in itself, creating new hope and new confidence. On one hand, the strengthening of… pic.twitter.com/UN8PFvusaS
— ANI (@ANI) December 1, 2025
हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी म्हणून मुद्दे उपस्थित करा :
पंतप्रधान मोदी म्हणाले, “एकीकडे लोकशाहीची ताकद आहे आणि दुसरीकडे, अर्थव्यवस्थेची ताकद आहे, ज्यावर जग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. भारतानं सिद्ध केलं आहे की लोकशाही कामगिरी करु शकते. भारताचा आर्थिक विकास ज्या वेगानं नवीन उंचीवर पोहोचत आहे त्यामुळं आपल्याला विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी नवीन बळ मिळते. विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि मजबूत मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. पराभवाच्या निराशेवर मात केली पाहिजे. काही पक्षांना पराभव पचवता येत नाही. मी आग्रह करतो की हिवाळी अधिवेशनाला पराभवाचं मैदान बनू देऊ नये किंवा विजयाचा अहंकार विकसित होऊ देऊ नये. लोकप्रतिनिधी म्हणून आपण इथं आपले मुद्दे उपस्थित केले पाहिजेत.”
#ParliamentWinterSession | Delhi: PM Narendra Modi says, “Negativity may be useful in politics. But ultimately, there should be some positive thinking for nation-building. I expect you to keep negativity within limits and focus on nation-building.”
“This winter session is also… pic.twitter.com/xCPIOba4XS
— ANI (@ANI) December 1, 2025
तरुण खासदारांनी संधी मिळावी :
पंतप्रधान मोदी म्हणाले, “संसदेत नव्यानं निवडून आलेले सर्व पक्षांचे खासदार किंवा तरुण खूप नाराज आणि दुःखी आहेत. त्यांना त्यांची ताकद दाखविण्याची किंवा त्यांच्या भागातील समस्या मांडण्याची संधी मिळत नाही. पक्ष कोणताही असो, आपण आपल्या तरुण खासदारांच्या नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. सभागृहानं त्यांच्या अनुभवांचा फायदा घ्यावा.” तसंच पुढं बोलताना मोदी म्हणाले, “जीएसटी सुधारणांमुळं देशवासीयांच्या हृदयात आदराचं वातावरण निर्माण झालं आहे. या अधिवेशनातही त्या दिशेनं बरंच काम करायचं आहे.” विरोधी पक्ष जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांचे विचार व्यक्त करू शकत नाही आणि सभागृहात आपला राग व्यक्त करत आहे. काही पक्षांनी एक नवीन परंपरा सुरु केली आहे. त्यांनी त्यांची रणनीती बदलण्याचा विचार करावा; मी सूचना देण्यास तयार आहे, असा चिमटाही मोदींनी विरोधकांना काढला.












