Republic Day Flag Hoisting : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदना मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असं सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन परिपत्रकात म्हटलं आहे.
हेही वाचा- महापालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर; तुमच्या शहराचा महापौर कोण?, वाचा संपूर्ण यादी
त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात एकाच वेळी ध्वजवंदना करण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० च्या पूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागामार्फत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. मुंबई येथील प्रमुख समारंभात मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री / मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजवंदन करतील, असं या परीपत्रकात म्हटलं आहे.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर… pic.twitter.com/ErXPcBfGal
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 21, 2026
ठाणे जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकानाथ शिंदे ध्वजवंदना करतील तर पुणे अजित पवार, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, सांगली चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, अमरावती दादाजी भुसे, यवतमाळ संजय राठोड, मुंबई शहर मंगलप्रभात लोढा, रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर डाॅ. अशोक उईके, सातारा शंभूराज देसाई, मुंबई उपनगर अॅड. आशिष शेलार, वाशिम दत्तात्रय भरणे, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, सोलापूर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, रायगड भरत गोगावले, बुलढाणा, मकरंद जाधव, सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंटकर, बीड बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश आबिटकर, गडचिरोली अॅड. आशिष जयस्वाल, वर्धा डाॅ. पंकज भोयर परभणी मेघना बोर्डीकर, गोंदिया इंद्रनील नाईक, नंदूरबार योगेश कदम यांच्याकडून राष्ट्रध्वजवंदन करण्यात येणार आहे.








