Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • RSS ची शताब्दी; पंतप्रधान मोदी म्हणाले, “राष्ट्र प्रथम…”
Top News

RSS ची शताब्दी; पंतप्रधान मोदी म्हणाले, “राष्ट्र प्रथम…”

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उद्या (2 ऑक्टोबर) विजयदशमीला 100 वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही नव्हता, त्यांनी इंग्रजांना साथ दिली, असे आरोप नेहमी केले जातात. या आरोपांना संघाकडून उत्तर दिले जात नाही किंवा त्यांच्याकडून दिलेल्या प्रत्युत्तराची फारशी दखल घेतली जात नाही. मात्र, आता खुद्द पंतप्रधान मोदी यांनी संघाची पाठराखण केली आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हीच संघाची पहिल्यापासून विचारसरणी होती, असे मोदी यांनी ठणकावून सांगितले आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या (2 ऑक्टोबर) शताब्दीसोहळा आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे त्यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्र निर्माण कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा 100 वर्षांत मोलाचे योगदान दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आरएसएसला वाहिलेले 100 रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. भारताच्या इतिहासात प्रथमच नाण्यावर भारतमातेला स्थान मिळाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात करण्यात आले होते. संघाला वाहिलेल्या नाण्यावर ‘राष्ट्राय स्वाहा, इदम राष्ट्राय, इदम ना माम’ असा संदेश आहे. याचा अर्थ सर्वकाही राष्ट्राला समर्पित आहे, सर्व काही राष्ट्राचे आहे, माझे काहीच नाही, असा होतो

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्र प्रथम’ ही संघाची विचारसरणी होती असे सांगितले. परिणामी ब्रिटिश आणि निजामाच्या राजवटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा त्रास सहन करावा लागला. उद्या (2 ऑक्टोबर) विजयादशमी आहे. या सणाचे हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. सत्याचा असत्यावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि प्रकाशाचा अंधकारावर विजय हे विजयादशमी सणाचे प्रतीक आहे. विजयादशमीनिमित्त संघाची 100 वर्षांपूर्वी स्थापना करणे हा निव्वळ योगायोग नव्हता. तर ते हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा, संस्कृतीचे पुनरुत्थान होते. आजची पिढी नशीबवान आणि भाग्यवान आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा पाहायला मिळत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts