Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • संजय राऊतांकडून दिलगीरी व्यक्त; दादा भुसे खटला घेणार मागे, नेमकं प्रकरण काय?
Top News

संजय राऊतांकडून दिलगीरी व्यक्त; दादा भुसे खटला घेणार मागे, नेमकं प्रकरण काय?

sanjay raut dada bhuse

Sanjay Raut Dada Bhuse : शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत हे एका मानहानीच्या खटल्यासंदर्भात मालेगाव न्यायालयात हजर झाले. मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्याची आज सुनावणी झाली. मात्र, सुनावणीदरम्यान मालेगाव न्यायालयात एक वेगळंच दृश्य घडलं. दोन्ही नेते एकमेकांशी वादग्रस्त असले तरी, ते येताच एकत्र हसताना दिसले, ज्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

न्यायालयात एकत्र हजर :

मालेगाव अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला सुरु होता. संजय राऊत आणि दादा भुसे दोघंही न्यायालयात हजर झाले. विशेष म्हणजे ते एकाच वेळी पोहोचले आणि आत एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला मागे घेतल्याचं सांगितलं. त्यांनी असंही म्हटलं की त्यांची मैत्री अबाधित आहे.

संजय राऊत यांना ठोठावण्यात आला दंड :

या प्रकरणात मागील सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहिल्यामुळं संजय राऊत यापूर्वी न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळं न्यायालयाने त्यांना 12,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, आजच्या सुनावणीसाठी ते स्वतः उपस्थित होते. संजय राऊत यांनी यापूर्वी माध्यमांना सांगितलं होतं की त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. त्यानुसार, त्यांच्या निर्दोष सुटकेसाठी प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर करण्यात आल्याचं वृत्त येत आहे. संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे हे मालेगाव न्यायालयात एकत्र हजर झाले. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. संजय राऊत लेखी माफी मागतील आणि या खटल्यातून माघार घेण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यात वाद काय :

सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेवरुन दोन्ही नेत्यांमधील हा वाद निर्माण झाला. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटी रुपयांच्या शेअर घोटाळ्याचा आरोप केला होता. हा दावा बदनामीकारक असल्याचं सांगून भुसे यांनी न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण :

जरी न्यायालयीन खटला एकमेकांविरुद्ध सुरु असला तरी, दोन्ही नेते न्यायालयात हसत हसत असल्याचं दिसून आलं, ज्यामुळं राजकीय चर्चा रंगली आहे. कायदेशीर लढाई एकीकडे सुरू असताना, मालेगाव न्यायालयाच्या आवारात वैयक्तिक मैत्रीपूर्ण वातावरण दिसून आले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts