The responsibility of the Guardian Minister positio : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर (Ajit Pawar has passed away) रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister Sunetra Pawar) पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी (Responsibility of Guardian Minister for Pune and Beed) सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी (Govt decision issued) करण्यात आला आहे.
हेही वाचा – मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर पदावरून आंदोलन पेटलं, मराठी एकीकरण समिती आक्रमक
काही दिवसांपूर्वी मुंबईवरून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना एका भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधननंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. सुनेत्रा पवार यांच्यावर आता मोठी जाबबादीर आहे. पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष होतं.
अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान
सुनेत्रा पवार यांच्यासमोर आता अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान आहे. पुण्याचा विस्तार आणि बीडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना प्रशासकीय कसब वापरावे लागणार आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
बीडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल – आमदार सोळंके
राज्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी बीडच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांच्या पश्चात सुनेत्राताई या पालकमंत्री झाल्याने अजितदादांचे बीडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, माझ्या सुनेत्राताई यांना शुभेच्छा.. अशी प्रतिक्रिया माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे.





