A technical fault occurred in Pankaja Munde’s helicopter : सध्या राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची (District Council Panchayat Committee Election) रणधुमाळी सुरू (Election campaign frenzy) आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय नेते प्रचार सभांमध्ये व्यक्त आहेत. अनेक मोठ्या नेत्यांवर इतर जिल्ह्यांची जबाबदारी सोपण्यात आहे. जिल्हा परिषदांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची धावपळ पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Environment Minister Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड (Pankaja Munde’s helicopter developed a technical fault) झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली (The helicopter accident was averted) असल्याचे बोललं जात आहे.
हेही वाचा – हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवाच – मुख्यमंत्री फडणवीस
मंत्री पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे या लातूरमध्ये प्रचारसभेसाठी जात होत्या, अशी माहिती समोर येत आहे. काहीच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल आहे. अशा परिस्थितीत आता आणखीन एक हेलिकाॅप्टर तांत्रिक बिघाडीची घटना समोर आल्याचे कार्यकर्ते चिंताग्रस्त आहेत.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा
पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली
यामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नियोजित कार्यक्रमांना विलंब झाला असला, तरी पंकजा मुंडे सर्व सभांना हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंकजा मुंडे सुरक्षित असल्याचे समजताच समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.






