नवी दिल्ली : नवी दिल्लीतील कावेरी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाला दुपारच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. आग आटोक्यात आणण्यासाठी चौदा गाड्या पाठवण्यात आल्या. संसद भवनाच्या अगदी जवळ असलेल्या या अपार्टमेंटमध्ये अनेक खासदार राहतात. अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीमुळं सर्वत्र घबराट पसरली. दीर्घ प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
अनेक खासदारांचं निवासस्थान :
वृत्तानुसार, हे अपार्टमेंट व्हीआयपी इमारत मानलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक खासदार इथं राहतात आणि ते संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी दुपारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात आग लागल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितले. बाबा खडग सिंह मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये दुपारी 1:22 वाजता आग लागल्याची माहिती त्यांनी दिली.
हे हि वाचा :अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसला आग; ऐन दिवाळीत रेल्वेसेवा विस्कळीत
फटाक्यांमुळं लागली आग :
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका व्यक्तीनं सांगितलं की त्यानं त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्या घरात अनेक दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. त्यानं सांगितलं की आगीमुळं मोठं नुकसान झालं आहे. माझी मुलगीही भाजली होती आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आग लागली तेव्हा कुत्राही फ्लॅटमध्ये उपस्थित होता; आग कशी लागली हे त्यांना माहित नव्हतं. पण असं दिसतं की मुलं फटाके फोडत होती आणि त्यामुळंच आग लागली.
#WATCH | A fire broke out at Brahmaputra Apartments in New Delhi. Six vehicles have been dispatched to the spot
More details awaited pic.twitter.com/eEk0UUyZzU
— ANI (@ANI) October 18, 2025
2020 मध्ये झालं उद्घाटन :
दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, चौदा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि दुपारी 2:10 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं होतं आणि त्यात अनेक लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची निवासस्थानं आहेत. अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, “चौदा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि दुपारी 2:10 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. घरातील वस्तूंपासून आग लागल्याचे वृत्त आहे.”