विष्णूगुप्त शिरोमणी म्हणजेच आचार्य चाणक्य यांचे नीतीशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र यासारखे लेखन आपण वाचलेले आहे. त्यानुसार तुम्ही एखादी काम करत असताना चाणक्यांच्या नीतीचे अनुसरण करून काम पूर्ण करू शकतात. जेणेकरून टीम वर करताना तुमचं लक्ष स्थिर राहील.
संघटना आणि व्यवस्थापन
चाणक्यनीति मध्ये सांगितल्याप्रमाणे ऑफिसमध्ये दिलेले अवघड टारगेट एक व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी टीम वर्क महत्त्वाचे असते. आणि टीम वर्क सोबत एकजूट असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सोबत मिळून काम करा. ज्यामुळे सर्वांचा विकास होईल आणि यश मिळेल. त्याचबरोबर एक यशस्वी टीम बनवण्यासाठी तुम्हाला संघटना आणि व्यवस्थापनाचे पालन करावे लागेल. त्याचबरोबर टीम मधील सर्व सदस्यांना त्यांची जबाबदारी माहिती असणे गरजेचे आहे.
संवेदनशीलता – चाणक्य नीति नुसार, टीम मधील प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही आवश्यक माहिती त्यांना समजून सांगू शकतात.
प्रोत्साहन आणि प्रशंसा
चाणक्य नीति प्रमाणे, तुमच्या टीम मेंबरसोबत संवाद साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्या टीमला त्यांच्या कामाचे क्रेडिट देणे, प्रोत्साहन देणे, प्रशंसा करणे गरजेचे आहे. त्यामुळे टीम वर्क करत असताना संपूर्ण टीम मेंबर आपलेपणाने काम करू शकेल.
हे हि वाचा : चाणक्य नीती : या सवयी तुम्हाला पण असतील तर माता लक्ष्मी होणार नाही प्रसन्न
संवाद साधणे गरजेचे
चाणक्य नीति नुसार तुमच्या टीम मेंबर सोबत संवाद साधने महत्त्वाचे आहे. जेणेकरून विचारांची देवाण घेवाण होईल. आणि त्याची प्रगती, चॅलेंजर्स सांगता येतील. एवढंच नाही तर समोरच्याची क्षमता आपल्याला कळू शकेल.
मेहनत करणे
करिअर करत असताना संघर्ष हा करावाच लागतो. त्याचबरोबर ऑफिसमध्ये टीम वर करत असताना किंवा सामूहिक समूहामध्ये काम करताना संघर्ष हा करावाच लागतो. त्याचबरोबर संघर्ष करताना शिकणे अति महत्त्वाचे आहे. आणि आलेल्या अडचणीवर उपाय शोधता देखील आले पाहिजे.
हे हि वाचा : चाणक्य नीती : या वस्तू दान केल्यास गरीब व्यक्ती देखील होऊ शकतो करोडपती
कामाची प्रशंसा
चाणक्य नीति नुसार, तुमच्या टीम मेंबर च्या कामाची प्रशंसा करणं, कामाच्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी मेहनत करणे गरजेचे आहे. टीम मेंबर पैकी एक मेंबर कामात कमी पडत असेल तरीही त्याचा स्वीकार करा. त्याचबरोबर त्या व्यक्तींनी केलेल्या कामाची प्रशंसा करा.