Chanakya Niti for success : आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि कौटिल्य सूत्रे हे लेखन मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला. आपल्या सर्वांना त्यांनी लेखन केलेल्या चाणक्य नीति अनुभवांचा संग्रह माहिती आहे. या संग्रहामुळे माणसांना त्यांच्या जीवनात खचून न जाता पुढे कसं जावं यासाठी प्रेरणा मिळते. या संग्रहामध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या यशस्वी धोरणे आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून आपण येणाऱ्या संकटांना मात करून पुढे जाऊ शकतो. तर जाणून घेऊ या 5 गोष्टी ज्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
कर्माने आणि गुणांनी व्हा श्रेष्ठ
आचार्य चाणक्य यांच्या मते कोणतीही व्यक्ती जन्म, कुळ, शरीर, संपत्तीच्या आधारावर श्रेष्ठ नसतो. तो त्यांच्या गुणांमुळे आणि कर्माने श्रेष्ठ होत असतो. एखादा व्यक्ती गरीब असला तरी तो त्याच्या ज्ञानाच्या जोरावर श्रेष्ठ बनू शकतो.
व्यक्ती कधीही भोळा नसावा
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर भोळेपणा सोडून द्या. जेणेकरून तुम्ही सरळ मार्गावर जाऊ शकतात. व्यक्तींमध्ये कधीही भोळेपणा नाही पण स्वभाव साधा असला पाहिजे. आणि वागण्यामध्ये देखील हुशारी असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात श्रेष्ठ होण्यासाठी साधेपणा सोडून तडफदार बनावे लागेल.
प्रगती करण्याचे साधने
आचार्य चाणक्य नीतिच्या नियमानुसार व्यक्तीला आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर सुसंगत असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये पैसे कमवण्याचे योग्य साधन, योग्य मित्र मैत्रिणी, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि पैसा खर्च करण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे.
स्वार्थ मागे जाऊ नका Chanakya Niti for success
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःच्या इच्छेने काम करणे चुकीचे नाही. पण त्या गोष्टी मागे स्वार्थी भावनेने विचार करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अचूक निर्णय घेण्यापासून वंचित राहू शकतात.











