Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग सुरु; कसं करायचं तिकिट बुक? वाचा सविस्तर प्रोसेस
ताज्या बातम्या

केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग सुरु; कसं करायचं तिकिट बुक? वाचा सविस्तर प्रोसेस

केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग सुरु; कसं करायचं तिकिट बुक? वाचा सविस्तर प्रोसेस

Kedarnath Helicopter Booking : केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी महत्त्वाची बातमी. चारधाम यात्रा (chardham yatra 2026) 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिल रोजी उघडतील. केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवेचं बुकिंग आज (11 एप्रिल) दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झालं आहे.

हेही वाचा : भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान पायलटकडून चूक; नेमकं काय घडलं?

प्रवास कधी शक्य होईल? :

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सेवेचं बुकिंग फक्त IRCTC च्या अधिकृत वेबसाइट वरुनच करता येईल. हे बुकिंग 22 एप्रिल ते 15 जून पर्यंतच्या प्रवासासाठी वैध असेल. तिकीट बुक करण्यापूर्वी उत्तराखंड पर्यटन पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. तिकीट बुक करताना लक्षात ठेवा की, एका आयडीवर जास्तीत जास्त सहा तिकिटं बुक करता येतील. (irctc heliyatra ticket )

तिकिटं कशी बुक करावी? :

सर्वप्रथम, IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. “तिकिटं बुक करा” (Book Tickets) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, दिलेल्या सूचनांचं पालन करा. उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांना उत्तराखंड पर्यटन पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदणीच्या आधारे, तुम्ही IRCTC वर लॉग इन करुन हेलिकॉप्टर राईडसाठी स्लॉट बुक करु शकता.

भाडं किती असेल? :

केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवा गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी या तीन ठिकाणांहून चालते. गुप्तकाशी ते केदारनाथ (येण्या-जाण्याचा प्रवास) भाडे अंदाजे ₹12,762, फाटा ते केदारनाथ ₹10,164 आणि सिरसी ते केदारनाथ ₹6390 आहे. (heliyatra ticket price)

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज :

प्रशासनानं भाविकांना फसव्या वेबसाइट्स, व्हॉट्सॲप नंबर्स आणि सोशल मीडियावरील ऑफर्सबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळं बुकिंग केवळ अधिकृत माध्यमांवरुनच करावं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts