Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Ram Navami 2026: यंदा रामनवमी कधी 26 की 27 मार्च? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करावी
धार्मिक

Ram Navami 2026: यंदा रामनवमी कधी 26 की 27 मार्च? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करावी

Ram Navami 2026 Date

Signficance of Ramcharitmanas Path on Chaitra Navami: राम नवमी २०२६ मध्ये लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे, कारण नवमी २६ आणि २७ मार्च या दोन्ही दिवशी आहे. चला तर मग पाहूया, पूजा करण्यासाठी योग्य तारीख कोणती आहे.

दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल नवमीला रामनवमी साजरी केली जाते. हा सण देशभरात मोठ्या उत्साह, श्रद्धा आणि आनंदाने साजरा केला जातो. रामभक्त या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा, अर्चना आणि व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात. मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की भजन-कीर्तन, रामकथा वाचन आणि धार्मिक सभा. राम नवमी फक्त भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव नाही, तर धर्म, सत्य आणि मर्यादेच्या स्थापनेचा पर्व मानला जातो, ज्यामध्ये लोक आध्यात्मिक उन्नती साधतात आणि भक्तिभाव व्यक्त करतात.

हेही वाचा: Horoscope: उद्या 10 मार्च! या राशींवर राहणार हनुमानजींची विशेष कृपा; वाचा तुमचे राशीभविष्य

मात्र, यंदा 2026 मध्ये अनेकांच्या मनात शंका आहे राम नवमी 26 की 27 मार्चला साजरी करावी? पंचांगानुसार तिथी आणि शुभ मुहूर्त ठरवले जातात, जे भक्तांना पूजा करण्यासाठी मार्गदर्शन करतात. शास्त्रानुसार, राम नवमी फक्त जन्मोत्सव नाही तर धर्म, सत्य आणि मर्यादेची स्थापना हा पर्व आहे. आजच्या खास लेखात आपण जाणून घेणार आहोत नवमीची खरी तारीख, शुभ मुहूर्त आणि घरच्या घरी पूजा कशी करावी.

चैत्र शुक्ल नवमी तिथी प्रारंभ: 26 मार्च 2026, सकाळी 11:38

चैत्र शुक्ल नवमी तिथी संपती: 27 मार्च 2026, सकाळी 10:06

जर राम नवमी दोन दिवस असेल, तर शास्त्रानुसार शास्त्रानुसार, “मध्यहने यदा नवमी, तदा राम जन्मोत्सव” म्हणजे, ज्यादिवशी नवमी तिथी दुपारी आली, तर त्याच दिवशी रामजन्मोत्सव व पूजा करणे शुभ आहे. म्हणून, 26 मार्च 2026 हा दिवस शास्त्रानुसार उपासनेसाठी पात्र आहे कारण तो मध्यान्ह नवमी तिथी आहे.

श्रीरामाची पूजा वेळ: सकाळी 11:13 ते दुपारी 1:41

27 मार्च 2026 राम नवमी

कॅलेंडरनुसार वैष्णव पंथाचे लोक हा दिवस साजरा करतील.

नवमी तिथीला सकाळी १० वाजेपर्यंत राहील.

पूजेची वेळ: दुपारी १२:२७

रामनवमी पूजा विधी

दुपारी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि उपवास करण्याचा संकल्प करा.

भगवान रामाच्या मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने स्नान घाला.

चंदन, फुले आणि तुळस अर्पण करा.

दुपारी १२ वाजता घंटा वाजवा, शंख वाजवा आणि “जय श्री राम” असा जयजयकार करा.

किंवा त्या वेळी रामचरितमानस किंवा वाल्मिकी रामायण बाल्कंड पठण करणे खूप शुभ मानले जाते.

गरजुंना अन्न दान करावे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts