Rupali Thombare protest against Rupali Chakankar : महिला आयोगाने महिलांची सुरक्षा सोडून,आत्महत्या झालेल्या भगिनीचे चारित्र्यहनन करून लक्तरे काढली. याच विकृतीच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल असे म्हणत ठोंबरेंनी, चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले. यावेळी चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यांनतर कुठल्याच संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीची, डॉ मुंडेंचं चारित्र्यहनन करण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे. त्यामुळे चाकणकरांचा राजीनामा घ्या असं हि ठोंबरे म्हणाल्या आहेत.












