‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटातून देशभरात ओळख मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय उपचारांचा खर्च खूप मोठा असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलंय. त्यांनी रामायण, विधिलिखित, ऐकावं ते नवल, घर संसार यामध्ये ही काम केले आहे












