Chennai defeat hat trick : आयपीएलच्या १९ व्या हंगामाला (IPL 19th Season) सुरूवात होऊन एक आठवडा उलटला. त्यामुळे आता या लिगमध्ये रंगली आहे. असे असताना मात्र एकेकाळी बराच दबदबा असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाला काही सूर गवसलेला नाही. चेन्नईचा लागोपाठ पराभव होत असून काल आरसीबी विरुद्धचा सामना हरल्यानंतर त्यांची पराभवाची हॅटट्रिक (A Hat-trick of Defeats) झाली.
हेही वाचा – पहिल्या डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, ‘या’ संघाने पटकावलं पहिलं स्थान..
आरसीबीविरुद्ध सीएसकेची आघाडीची फळी सपशेल नाकाम ठरली आणि संघाला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली. सीएसकेच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा मात्र प्रचंड संतापला आहे. काल पराभवाची हॅटट्रिक झाल्यावर कॅप्टन गायकवाडच्या रागाच उद्रेक झाला. त्यानंतर त्याने या पराभवाला कारण असलेल्या व्यक्तीचं नाव स्पष्टपणे घेत खापर त्याच्यावर फोडलं,
विशेष म्हणजे, कालच्या आरसीबीविरुद्धच्या पराभवाबद्दल ऋतुराज गायकवाडने स्वतःच जबाबदारी घेतली. मी जर आणखी धावा केल्या असत्या, तर मॅचचा निकाल काही वेगळा लागला असता, पण मी तसं करून शकलो नाही, असं म्हणत त्याने स्वतःच्याच खेळीची चिरफाड करत अपयशाची जबाबदारी स्वीकारली.
आयपीएल 2026 मधील चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवामुळे कॅप्टन ऋतुराज गायकवाड प्रचंड संतापला आहे. काल आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्यांदा संघ हरल्यामुळे कॅप्टन निराश असून त्याने या पराभवाचं कारण त्याने सांगितलं आहे.












