भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज रविवार, 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर आफ्रिकन संघानंही 4 वेळा विजेतेपद पटकावलेल्या इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या ध्येयानं मैदानात उतरतील. विशेष म्हणजे या सामन्यात कोणीही जिंकलं तर क्रिकेटला एक नवा विश्वविजेता मिळेल.
टीम इंडियाचं दमदार पुनरागमन
टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. सुरुवातीला संघानं शानदार कामगिरी केली, परंतु स्पर्धेच्या मध्यात सलग तीन पराभवांमुळं त्यांना अपयश आले. मात्र त्यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्जनं तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. तिनं नाबाद 127 धावा केल्या आणि भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौरनंही 89 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या शानदार फलंदाजीमुळं भारतानं 339 धावांचं लक्ष्य गाठलं. महिला विश्वचषक बाद फेरीच्या इतिहासात हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग होता.
हे ही वाचा – भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा भिडणार, कधी आणि कुठं होणार सामना?
दक्षिण आफ्रिकेची कामगिरी कशी
दुसरीकडे, संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिका हा सर्वात सातत्यपूर्ण संघ राहिला आहे. लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेनं शिस्त आणि आक्रमकतेचं परिपूर्ण मिश्रण दाखवलं आहे. अष्टपैलू मॅरिझाने कॅप आणि वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाका यांनी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं.
It all comes down to THIS 🏆
Watch #INDvSA LIVE, broadcast details here 📲 https://t.co/7wsR28PFHI#CWC25 pic.twitter.com/rhuio7OdNs
— ICC (@ICC) November 2, 2025
महिला विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ :
भारत संघ : दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, रिचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, रेणुका सिंग, शफाली वर्मा,
दक्षिण आफ्रिका संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), सुने लुस, मारिझान कॅप, मसाबता क्लास, तुमी सेखुखुने, नदिन डी क्लार्क, तझमिन ब्रिट्स, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अनेके बॉश, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, क्लो ट्रायोन, एनेरी डेरकसेन, कराबो मेसो (विकेटकीपर)












